महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shahpur Bus Accident : शिंदे गटाच्या मेळाव्यात आलेल्या दोन एसटी बसला ट्रकची जोरदार धडक; अपघातात २५ कार्यकर्ते जखमी.. पाहा व्हिडिओ - CM Eknath Shinde

Shahpur Bus Accident : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाचा मेळावा (Dussehra Melava) आझाद मैदानावर पार पडला. हा दसरा मेळावा संपल्यानंतर परतीच्या प्रवासात शिंदे गटाच्या दोन बसचा शहापूरच्या कळंभे गावाजवळ अपघात झाला.

Bus Accident
बसला ट्रकची जोरदार धडक

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 3:56 PM IST

Updated : Oct 25, 2023, 9:14 PM IST

दोन एसटी बसला ट्रकची जोरदार धडक

ठाणेShahpur Bus Accident : मुंबईतील आझाद मैदानातून दसरा मेळावा (Dussehra Melava) संपल्यावर कार्यकर्त्यांना घरी घेऊन जाणाऱ्या शिंदे गटाच्या दोन एसटी बसचा मुंबई नाशिक महामार्गवरील कळंभे गावाजवळ अपघात (Bus Accident) झाला आहे. पाठीमागून आलेल्या ट्रकने एसटी बसला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. या अपघातात २५ कार्यकर्ते जखमी झाले. शिंदे गटाचे शिवसैनिक मुंबईहून सिल्लोडला जात असताना ही दुर्घटना घडली. हा विचित्र भीषण अपघात पहाटे अडीचच्या सुमारास घडला. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

मुंबईतील आजाद मैदानातून दसरा मेळावा संपल्यावर कार्यकर्त्यांना घरी घेऊन जाणाऱ्या शिंदे गटाच्या दोन एसटी बसचा मुंबई नाशिक महामार्गवरील कळंभे गावाजवळ अपघात झाला. या अपघातात २५ कार्यकर्ते जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस आणि ट्रक क्रेनच्या साहाय्याने हटवण्यात आली आहे. दरम्यान. एका एसटी बसला ट्रकने मागून धडक दिली, त्याच वेळी धडक देणाऱ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बसने धडक दिल्याने, बस रस्त्याच्या लगत असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. सध्या जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची शहापूर पोलीस ठाण्यात (Shahapur Police Station) नोंद करण्यात आली आहे. - अनंत पराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

अशी घडली घटना : शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते परिवहन महामंडळाच्या २०० बसमध्ये प्रवास करीत मुंबईत आले होते. दसरा मेळावा संपल्यावर रात्रीचे जेवण करून या एसटी बसेस आज पहाटेच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघाल्या होत्या. या बस मुंबई नाशिक महामार्गवरील कळंभे गावाच्या हद्दीत येताच मागून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दोन बसेसही एकमेकांवर धडकल्या. ट्रक आणि एक बस थेट साईड डिव्हायडर तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळले. तर, इतर दोन बसचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.


हेही वाचा -

  1. Nilesh Rane Retirement : निलेश राणेंच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर 'सागर' बंगल्यावर खलबतं; मंत्री रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा
  2. Nagar Kalyan Highway Accident : नगर कल्याण महामार्गावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; अनेक प्रवासी जखमी
  3. Jalna Accident : भरधाव ट्रॅक्टरनं दुचाकीला चिरडलं; पेट्रोल भरायला जाणाऱ्या बाप लेकासह तिघांचा मृत्यू
Last Updated : Oct 25, 2023, 9:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details