ठाणे -राज्यात गुरुवारी रात्री ८नंतर कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. सदर लॉकडाऊन हा १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. लॉकडाऊनमध्ये कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. तसेच कोरोनाचे वाढते रुग्ण, बेडसाठी धावपळ, यासाठी वाहने उपलब्ध होणार नाही. वाहतूक शाखेने काही सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केले होते, त्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत ठाणे पोलीस बॉइज संघटनेने अबोली रिक्षा चालक व मालकांशी समन्वय साधला आहे. त्याानुसार लॉकडाउन निर्बंधाची अंमलबजावणी करत असताना नागरिकांच्या सोयीसाठी अबोली रिक्षा चालक व मालक यांचे मदतीने नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची योजना पुढे आली आहे. त्यामुळे आता रुग्णांची हेळसांड होणार नसून त्यांच्या मदतीला अबोली रिक्षा धावून येणार आहे.
गरजू आणि रुग्णांना अबोली रिक्षा देणार मोफत सेवा - Thane aboli rickshaw
लॉकडाऊन हा १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. लॉकडाऊनमध्ये कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. तसेच कोरोनाचे वाढते रुग्ण, बेडसाठी धावपळ, यासाठी वाहने उपलब्ध होणार नाही. वाहतूक शाखेने काही सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केले होते, त्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत ठाणे पोलीस बॉइज संघटनेने अबोली रिक्षा चालक व मालकांशी समन्वय साधला आहे.
कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी यामध्ये रुग्णांचे, आजारी माणसाचे हाल होऊ नये त्यासाठी गरजू आणि आजारी रुग्णांना मदतीचा हात देण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. लॉकडाऊनमध्ये व्हॅनच्या अभावाने उपचार मिळण्यास रुग्णांना विलंब होत असल्याचे समोर आल्याने वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त बाळासाहेब पाटील यांनी सामाजिक संस्थांना आवाहन केले होते. वाहतूक शाखेच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत ठाणे बॉइज संघटना पुढे आली. त्यांनी अबोली रिक्षा चालक आणि मालक यांच्याशी संवाद साधत नागरिकांना लॉकडाऊन काळात रुग्णांना मोफत अबोली रिक्षा उपलब्ध करून देण्याची योजना पुढे आली.
ठाणे वाहतूक शाखेच्या माध्यमातून गरजू आणि रुग्णांसाठी अबोली रिक्षा चालकांनी संमती दर्शविली असून तब्बल २२ अबोली रिक्षा या ठाणेकर रुग्णांना आणि गरजूंना मोफत प्रवास देणार आहेत. यात नितीन कंपनी जंक्शन येथे-५, कॅडबरी जंक्शनला-५, कापूरबावडी ते-घोडबंदर रोड-५, तीनहात नाका-५ आणि वागळे परिसरात -२ अबोली रिक्षा या तैनात करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांनी या २२ अबोली रिक्षा चालकांचे नंबर देण्यात आलेले आहेत. वाहतूक पोलीस उप-आयुक्त बाळासाहेब पाटील यांनी ठाणेकरांना आवाहन केले आहे, की गरजू आणि रुग्ण नागरिकांनी मोबाइलवर संपर्क साधावा. कडक निर्बंध असलेल्या लॉकडाऊनमध्ये रुग्ण आणि ठाणेकरांना वाहनाच्या अभावी हाल होऊ नये, म्हणून ही योजना राबविण्यात आलेली आहे.