महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमच्या मोर्चावर काय बोलता? संपूर्ण सरकारच राष्ट्रवादी 'स्पॉन्सर' - महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पोलिसांना हे घुसखोर कोठे आहेत हे माहीत आहे. पोलिसांचे हात मोकळे करा, सरकारच्या दबावापोटी त्यांच्यावर कारवाई होत नाही. नसेल तर काही दिवसांत मनसैनिक त्यांना बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत, असे मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले.

अविनाश जाधव
अविनाश जाधव

By

Published : Feb 9, 2020, 12:27 PM IST

Updated : Feb 9, 2020, 4:03 PM IST

ठाणे - बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून घुसखोरांविरोधात मनसेच्या वतीने आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चा आधी ठाण्यातील मनसैनिकांनी पाचपाखडी येथे मारुतीच्या देवळात ठाणे, पालघर जिल्हा नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते आरती केली.

मनसे नेते अविनाश जाधव

डोक्यावर भगव्या टोप्या, हातात राजमुद्रा झेंडे आणि भारताचा ध्वज घेऊन आरतीला मनसैनिक सहभागी झाले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मोर्चाला भाजप पुरस्कृत म्हणत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अविनाश जाधव यांनी सांगितले की, ज्या शिवसेनेचे सरकार अजित पवारांच्या केबिनमधून चालते, ते आम्हाला शिकवणार का? की, आमचा मोर्चा कोणी 'स्पॉन्सर' केला. संपूर्ण सरकारचं राष्ट्रवादी 'स्पॉन्सर' आहे. शिवसेनेचे नगरसेवक आता कामे घेऊन उद्धव ठाकरेंऐवजी अजित पवारांकडे जातात. उद्या शिवसेना अजित पवारांनी चालवली तर नवल वाटायला नको.

हेही वाचा -'मैदान सोडून पळणारा मी नाही; सरकार येत नाही तोपर्यत कुठेही जाणार नाही'

पोलिसांना हे घुसखोर कोठे आहेत हे माहीत आहे. पोलिसांचे हात मोकळे करा, सरकारच्या दबावापोटी त्यांच्यावर कारवाई होत नाही. नसेल तर काही दिवसांत मनसैनिक त्यांना बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत असेही जाधव म्हणाले.

आरती मनसैनिक

हेही वाचा -LIVE मनसेचा घुसखोरांविरोधात महामोर्चा : हिंदू जिमखान्याजवळ मनसैनिकांची प्रचंड गर्दी

Last Updated : Feb 9, 2020, 4:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details