ठाणे -एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपण किती मोठे भाई आहोत, हे सिद्ध करण्यासाठी काही गुंडानी एका तरुणाला विवस्त्र करुन बेदम मारहाण केली. ही घटना श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मारहाण करणाऱ्या पाच तरुणांपैकी दोन तरुण अल्पवयीन आहेत. त्यांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे.
श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर चौकात या तरुणाला मारहाण करण्यात आल्याची ही घटना १२ जूनला घडली होती. अमका भाई माझा बॉस आहे, असे जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मारणार, या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला. ही मारहाण पाहून कोणी ही त्या तरुणाला वाचवण्यास मध्ये पडले नाही. या मारहाणीमुळे तो तरुण इतका घाबरला होता की तो पोलिसात तक्रारही करायला घाबरत होता.