ठाणे - मुंब्रा परिसर नशेडी आणि अमली पदार्थ तस्करांचा अड्डा बनत चालला आहे. अंमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. यात पोलीस पथकाने सापळा रचून पटेल हायस्कुल जवळ एमडी पावडर विकणाऱ्या महिलेला अटकेत घेतले. साहीदा इरफान शेख(२८) असे आरोपी महिलेचे नाव असून तिच्याकडून १९७ ग्राम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.
सव्वाचार लाखाच्या मेफेड्रीन पावडरसह एका महिल अटकेत; इंनडिपीएस कायद्यानुसार कारवाई - मुंब्रा पटेल हायस्कुल
अंमली पदार्थ विक्रीच्या संशयातून अटक करण्यात आलेल्या महिलेजवळ १९७ ग्राम एमडी पावडर सापडली. या पावडरची किंमत बाजारात ४ लाख ३३ हजार ४०० रुपये असून आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
अंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी तयार केलेल्या पथकाला एमडी पावडर विकणाऱ्या महिलेची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मुंब्रा पटेल हायस्कुलच्या बाजूला, सलमान बिल्डिंग खाली मुंब्रादेवी रोड मुंब्रा येथे पोहोचले. सदर महिला एमडी पावडर विक्रीसाठी आली होती. पोलीसांना संशय येताच पोलीस पथकाने तिला हटकले. तिची अंगझडती घेतली असता तिच्याकडे १९७ ग्राम एमडी पावडर सापडली. या पावडरची किंमत बाजारात ४ लाख ३३ हजार ४०० रुपये असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
पोलीस पथकाने आरोपीला अटक केली आहे. आरोपी मुंब्रादेवी रोड येथील पटेल हायस्कुलजवळ सलमान बिल्डिंगच्या, ए विंग रूम नं ३०१ मुंब्रा येथे राहत होती. पोलिसांनी तिच्या विरोधात अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.