महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोरट्याने इमारतीत घुसून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले - Sindhu Sonawane Mangalsutra stolen

निर्जन रस्त्यावर धूम स्टाईलने दुचाकीवरून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविण्याच्या घटना सातत्याने घडत असतानाच, आता चोरट्यांनी चक्क इमारतीत घुसून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mangalsutra stolen building Ulhasnagar
सिंधू सोनवणे मंगळसूत्र चोरी उल्हासनगर

By

Published : Feb 28, 2021, 7:28 PM IST

ठाणे -निर्जन रस्त्यावर धूम स्टाईलने दुचाकीवरून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविण्याच्या घटना सातत्याने घडत असतानाच, आता चोरट्यांनी चक्क इमारतीत घुसून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मंगळसूत्र पळविताना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून, फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

घटनेचे दृष्य

हेही वाचा -ठाणे मध्यवर्ती बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढविणार

अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र लांबवत धूम ठोकली

उल्हासनगर कॅम्प ४ भागातील 'मेरा घर' या को. ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमध्ये सिंधू सोनवणे या कुटुंबासह राहतात. त्या २७ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता घरी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या इमारतीमध्ये एक अज्ञात चोरटा त्यांच्या पाठोपाठ शिरला आणि त्याने मागून येऊन त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. या प्रकरणी विठ्ठल वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहे.

यापूर्वीही बंगल्याच्या आवारात घुसून मंगळसूत्र लंपास करण्याचा प्रयत्न

डोंबिवलीच्या मिलापनगरमध्ये सुहासिनी परांजपे (वय ८०) आणि त्यांचे पती शरदचंद्र परांजपे (वय ८५) हे गेल्या सोमवारी आपल्या बंगल्याच्या आवारात सकाळी साडे दहाच्या सुमारास बागकाम करीत होते. त्यावेळी स्कूटरवरून आलेल्या एका व्यक्तीने काही वेळ त्यांचा बंगल्यासमोर टेहळणी केली. त्यानंतर बंगल्याच्या कंपाऊंडचे बंद गेट उघडून एका चोरट्याने आत प्रवेश केला आणि बागकाम करतानाच सुहासिनी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. सुहासिनी यांनी विरोध केला असता अनोखळी चोरट्याने त्यांना ढकलून पळ काढला होता.

हेही वाचा -खळबळजनक! घरात घुसून वृद्ध महिलेची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details