ठाणे - रांगेत उभे राहून रेल्वे प्रवासाचे तिकीट मागणाऱ्या महिलेला तिकीट नाकारत शिवीगाळी केल्याची घटना आज ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नं १ वरील तिकीट खिडकी क्र. ९ वर घडली. शिवी ऐकल्यानंतर महिला आणि सहप्रवाशांनी पळून गेलेल्या कर्मचाऱ्याला समोर आणा, अशी मागणी करीत गोंधळ घातला. रेल्वे स्थानकावरील गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात रेल्वे कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -भिवंडी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह प्रभारी शहर विकास प्रमुख निलंबित
याबाबतची हकीकत अशी की, ३२ वर्षीय महिला तक्रारदार या ठाण्याच्या ज्ञानेश्वरनगरमध्ये राहतात. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्या कामावर निघाल्या. ठाणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नं १ वरील तिकीट खिडकी क्र ९ वर त्या तिकिटीसाठी रांगेत उभ्या राहिल्या. जेव्हा तिकिटासाठी नंबर आला, तेव्हा तिकीट काउंटरवरील रेल्वे कर्मचाऱ्याने तक्रारदार महिलेला आयडी मागितली. त्यानुसार महिलेने आयडी दाखविल्यानंतर त्याने तिकीट देण्यास नकार दिला. दरम्यान अर्धातासापेक्षा जास्त रांगेत उभे राहून तिकीट न दिल्याने हा कसला रोज रोजचा प्रकार आहे. असे म्हणून महिलेने तिकीट काउंटर सोडले. रांगेत गर्दी होती. तिकीट काउंटरवरील कर्मचाऱ्याने मात्र महिलेच्या दिशेने पेन भिरकावला. तो काचेवर आदळला आणि त्याने ए...असे म्हणत आई-बहिणीवरून अवार्च्य शिवीगाळ केली. जेव्हा महिलेने शिवीगाळ ऐकली. तेव्हा तिकीट दिली नाही, उलट शिवीगाळी करणारा तू कोण? असा प्रश्न उपस्थित करताच प्रवासाची गर्दी जमली. त्यातील बहुतांश प्रवाशांनी शिवीगाळी ऐकलेली होती. तक्रारदार महिलेने जाब विचारताच संतापलेल्या प्रवाशांना पाहून रेल्वे कर्मचारी परागंदा झाला.
शिवीगाळी करणाऱ्या कर्मचाऱ्याला समोर आणा, प्रवाशांची मागणी