ठाणे -भिवडीतएका सार्वजनिक शौचालयाला भीषण आग लागली. ही घटना आज सकाळच्या सुमारास वीजवितरणच्या पॉवर हाऊसच्या भिंतीलगत असलेल्या सार्वजनिक शौचालयात घडली. या भीषण आगीत संपूर्ण सार्वजनिक शौचालय जळून खाक झाले.
भिवंडी शहरातील कल्याण-भिवंडी रोडवर जुने पॉवरहाऊस असून या ठिकाणावरून वीजपुरवठा होतो. तर, त्याच्याच बाजूला अधिकारी-कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या परिसरात नागरी वस्ती असल्याने भिवंडी महापालिकेने २० ते २५ वर्षापूर्वी पॉवरहाऊस समोरच्या फुटपाथवर नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय उभारले होते. कालांतराने याठिकाणी फायबरचे शौचालय उभारण्यात आले. मात्र, हे शौचालय दुरावस्थेत असूनही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. अशातही परिसरातील नागरिक या शौचालयाचा वापर करीत होते. त्यातच आज सकाळच्या सुमाराला अचानक शौचालयाला आग लागली.