ठाणे - मतदानाचा टक्का वाढण्यासाठी विविध मतदारसंघात खाद्यपदार्थ, कपडे, सलून चालकांसह आदी व्यापाऱ्यांनी सवलती दर जारी केले. त्याच धर्तीवर भिवंडी ग्रामीण मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी एका खाजगी रुग्णालयाने मतदारांसाठी विविध आरोग्य चाचण्या मोफत करण्याचे जाहीर केले. याद्वारे लोकशाहीचा सण समजल्या जाणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी रुग्णालयानेही हातभार लावला.
भिवंडी तालुक्यातील कोनगाव परिसरात वेद रुग्णालयामध्ये बोटावरची शाई दाखवा, अन आरोग्य तपासणी मोफत करून घ्या, असे जाहीर करण्यात आले होते. या उपक्रमाला मतदारांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला. नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान करीत आपल्या आरोग्याच्या विविध तपासण्या मोफत करून घेतल्या. मतदानाच्या टक्का वाढावा या उद्देशातून हा उपक्रम राबविल्यात आल्याचे डॉ. गिरीष केणी यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.