ठाणे - मध्य रेल्वेच्या कल्याण कर्जत रेल्वे मार्गावर असलेल्या वांगणी रेल्वे स्थानकात उद्यान एक्सप्रेस येत असतानाच चिमुकला रेल्वे रुळावर अचानक पडला होता. त्यावेळी तेथील पॉईंटमनने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यांच्या या धाडसाचे रेल्वे अधिकाऱ्यांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केले आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही सेकंदांनी मुलाचा जीव वाचला होता. रेल्वेचे पॉइंट्समन मयूर शेळके यांनी दाखवलेल्या हिंमतीबाबत रेल्वे प्रशासनाकडून मयूर शेळके याला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले. त्यापैकी 25 हजार रुपये त्याने त्या अंध महिलेला दिले. त्यामुळे धाडसाबरोबर या देवदूताकडून माणुसकीचे दर्शनही घडल्याचे पाहवयास मिळाले आहे.
देवदूताला धाडसापायी मिळाली जावा बाईक
जावा हिरोजच्या धोरणानुसार क्लासीक लीजेंडचे प्रमुख अनुपम थेरजा यांच्याकडून मुयर शेळके याला नवीन जावा बाईक गिफ्ट देण्यात आली. तर महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनीही मयूर शेळकेचे कौतुक केले. मयूर यांच्याजवळ खास ड्रेसकोड किंवा टोपी नाही, तरीही मयूर यांनी सुपरहिरोच्या तुलनेत अधिक धाडसी काम केले, अशा शब्दात आनंद महिंद्रा यांनी त्याचे कैतुक केले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मयूरच्या धाडसाचे कौतुक करत, त्याला फोन करून शुभेच्छा देत, आपण केलेले काम अतुलनीय असल्याचे म्हटले आहे.
अंधमातेच्या मागणीला यश