ठाणे -कल्याणमधील सहजानंद चौकात एका पादचाऱ्याला भरधाव ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. केतन मांडगुळकर असे मृताचे नाव असून तो खडकपाडा येथील रहिवासी असल्याचे माहिती आहे. दरम्यान ट्रकचालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
केतन मांडगुळकर हे पायी चालत कल्याण स्टेशनच्या दिशेने जात होते. पहाटेच्या सुमारास सहजानंद चौकाजवळ वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याला चिरडले. त्यानंतर चालक ट्रकसह अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकखाली चिरडलेल्या पादचाऱ्याच्या शरीराचे अवशेष इतस्ततः विखुरले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पादचाऱ्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्हीद्वारे ट्रक चालकाचा शोध
भरधाव ट्रकखाली चिरडून पादचारी ठार; कल्याणच्या सहजानंद चौकातील घटना - सहजानंद चौकात व्यक्तीला चिरडले
केतन मांडगुळकर हे पायी चालत कल्याण स्टेशनच्या दिशेने जात होते. पहाटेच्या सुमारास सहजानंद चौकाजवळ वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याला चिरडले. त्यानंतर चालक ट्रकसह अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकखाली चिरडलेल्या पादचाऱ्याच्या शरीराचे अवशेष इतस्ततः विखुरले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पादचाऱ्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे.
![भरधाव ट्रकखाली चिरडून पादचारी ठार; कल्याणच्या सहजानंद चौकातील घटना चिरडले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13381363-thumbnail-3x2-accie.jpeg)
अपघातच्या घटनास्थळी असलेल्या रस्त्याच्या ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीद्वारे चालकाचा पोलीस शोध घेत आहे. सहजानंद चौकात अनेकदा लहान-मोठे अपघात घडले आहेत. या चौकातून ये-जा करणाऱ्या वाहनांचा वेग कायम जास्त असतो. त्यामुळे पादचाऱ्यांना अनेकदा येथे धडक बसते. ज्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. या चौकात भरधाव वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी कल्याणकरांकडून मागणी केली जात आहे.
हेही वाचा -पश्चिम बंगाल : दुर्गा विसर्जनानंतर घरी परतणाऱ्यांवर पेट्रोल बॉम्बचा हल्ला; सहा जण जखमी