ठाणे - एका महिलेची हत्या करुन तिची ओळख पटू नये यासाठी तिचा चेहरा व डोळे जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीने केला आहे. या घटनेने अंबरनाथ शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना अंबरनाथच्या काटईगाव परिसरात असलेल्या पाईप लाईन लगत घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ढाब्यावाल्यामुळे घटना उघडकीस
अंबरनाथ तालुक्यातील हद्दीतील काटाई बदलापूर रोडवरील पाईप लाईनलगत 25 ते 30 वर्षीय वयोगटातील एका महिलेचा चेहरा व डोके जाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. किशोर देसाई यास काटाई-बदलापूर रस्त्यावरील युवराज धाब्याजवळील पाईपलाईन लगत सोमवारी (दि. 21 डिसें.) दुपारच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा मृतदेह दिसला. त्यांनी या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उपस्थित असणारे ठाणे अमलदार सहायक फौजदार गोकूळ बागल यांना दिली. ज्या ठिकाणी त्या अज्ञात महिलेचा मृतदेह पडलेला होता. घटनास्थळी जाऊन शिवाजीनगर पोलिसांसह डीबी पथकानेही पाहणी केली. त्यावेळी लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेल्या एका महिलेचा मृतदेह दिसला.
महिलेची ओळख पटू नये म्हणून जाळला मृतदेह