महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रेयसीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी, एकाची गळा चरून हत्या केल्याचे उघड

अंबरनाथमध्ये बदलापूर रोडवर असलेल्या चिखलोली परिसरातील एका मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीचा गळा चिरलेला अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ होती. या हत्येचे धक्कादायक कारण पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकरानेच प्रेयसीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी निष्पाप कामगाराची गळा चरून हत्या केल्याचे उघड झाले आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Apr 7, 2022, 8:41 PM IST

ठाणे - अंबरनाथमध्ये बदलापूर रोडवर असलेल्या चिखलोली परिसरातील एका मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीचा गळा चिरलेला अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ होती. या हत्येचे धक्कादायक कारण पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकरानेच प्रेयसीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी निष्पाप कामगाराची गळा चरून हत्या केल्याचे उघड झाले आहे. वामन शिंदे, असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे असून अमित दास, असे हत्या झालेल्या निष्पाप नाका कामगाराचे नाव आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक

अमितचा मृतदेह १ एप्रिलला सकाळच्या सुमारास अंबरनाथ शहरातील बदलापूर रोडवर असलेल्या चिखलोली परिसरातील एका मोकळ्या जागेत आढळून आला होता. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात रवाना करून अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. मृतदेहाच्या खिशात एका महिलेचे मतदान कार्ड आढळून आले. दुसरीकडे मृताची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असता, मृत अमित हा कल्याण पश्चिम भागातील छत्रपती शिवाजी चौकातील नाका कामगार असल्याचे समोर आले असून तो नाक्यावरच उघड्यावर राहत होता.

आरोपी वामन आणि त्याची प्रेयसी यांच्यात 15 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, एका प्रकरणात आरोपी वामन काही वर्षे कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. आरोपी वामन याला प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये वाद झाले होते. त्यातच प्रेयसीला धडा शिकवण्याच्या उद्देशाने त्याने कल्याण शहरातील नाका कामगार असलेल्या अमित दास याला काम देण्याच्या बहाण्याने कल्याणहून अंबरनाथला लोकलने नेले. त्यानंतर चिखलोली भागात निर्जनस्थळी त्याची गळा चिरून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे प्रेयसीला या हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आरोपी वामनने मृत अमितच्या खिशात प्रेयसीचे मतदान ओळखपत्र आणि एक चिट्ठी ठेवली होती. जेणेकरून पोलिसांच्या तपासात आपल्या प्रेयसीने हत्या केल्याचे समजून पोलीस तिला अटक करतील. मात्र, अंबरनाथ पोलिसांनी शिताफीने तपास करून प्रियकर वामनला 6 मार्चला अमितच्या हत्येप्रकरणी अटक करत त्याचा बेत उधळून लावला. मात्र, या घटनेत एका निष्पाप तरुणाचा नाहक बळी गेल्याने कल्याणमधील नाका कामगारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -IPL Betting : हायप्रोफाईल गेस्ट हाऊसमध्ये आयपीएलवर सट्टेबाजी करणाऱ्या दोघांना न्यायालयीन कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details