महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परमबीर सिंगांना झटका, लुकआऊट नोटीस जारी - ठाणे न्यूज

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

singh
singh

By

Published : Aug 12, 2021, 8:38 PM IST

Updated : Aug 12, 2021, 9:30 PM IST

ठाणे -माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

दोन पोलीस ठाण्यांची नोटीस

कोपरी आणि ठाणे नगर पोलीस स्थानक या दोन्ही पोलीस ठाण्याने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. परमबीर यांच्यासोबत याच खंडणी प्रकरणातील इतर मोठ्या आरोपींच्या विरोधात देखील लूक आऊट नोटीस काढण्याची प्रक्रिया लवकरच ठाणे पोलीस करणार आहे.

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर कोट्यवधींची खंडणी उकळल्या प्रकरणी ठाण्याच्या कोपरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी परमबीर यांच्यासह संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि मनेरे यांच्यावर कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, ४२०, ३६४ ए, ३४, १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कोपरी पोलिसांनी संजय पुनमीया आणि सुनील जैन याना अटकही केली आहे. तर परमबीर सिंग यांच्यावर मात्र ठाणे नगर पोलीस ठाण्यात फिर्यादी केतन तन्ना, सोनू जलान आणि रियाज भाटी यांच्या तक्ररीनुसार परमबीर सिग यांच्या विरोधात भादंवि ३८४, ३८६, ३८७, ३८९, ३९२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ५०६(२), १०९, १६६, १२० ब आणि २५ नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे अखेर ठाणे पोलिसांनी गुन्ह्याची मालिका आणि गंभीरता पाहता परमबीर सिंग यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यापूर्वीही परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

हेही वाचा -'तुम्ही राष्ट्रपती कधी होणार?' चिमुकलीचा पंतप्रधान मोदींना सवाल

Last Updated : Aug 12, 2021, 9:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details