ठाणे :शेतातील हरभरा चोरल्याच्या संशयातून कामगारावर कुऱ्हाड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ( Beaten With An Ax In Thane ) आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील उंबर्डे गावात घडली आहे. हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
गंगा सिंग असे या हल्ल्यात जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर नवनाथ लोखंडे आणि रोहित लोखंडे असे हल्लेखोरांची नावे आहेत. याप्रकरणी या दोन हल्लेखोर शेतकऱ्यांविरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एका इमारतीच्या साईटवर काम करणारा कामगार गंगा सिंग हा आपल्या घरी काल (शनिवार) सायंकाळच्या सुमारास हरभरा खात बसला होता. हे पाहून बाप लेकांनी गंगावर हरभरा शेतीतून चोरल्याचा आरोप करत दांडके आणि कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. यावेळी डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घालत असताना गंगाने हातावर घाव झेलत जीव वाचवला. याप्रकरणी गंगाने दिलेल्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा -Aaditya Thackeray On Vidarbha Tour : विदर्भात पर्यावरण जपायला मोठा वाव - आदित्य ठाकरे