ठाणे - रिक्षाचालकाने २३ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पीडिता २ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात पीडितेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. महेश सूर्यवंशी (वय - २४) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
लग्नाच्या आमिषाने रिक्षाचालकाचा तरुणीवर अत्याचार, पीडिता दोन महिन्याची गर्भवती - अत्याचार प्रकरण अंबर पोलीस
रिक्षाचालकाने २३ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पीडिता २ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - मंदिराच्या साहित्यांची चोरी करणारे दोघे गजाआड; मुद्देमाल हस्तगत
अंबरनाथ शहरातील मेटलनगरमध्ये आरोपी महेश राहतो. त्याने एका तरुणीला काही महिन्यापूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांनतर तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला बारवी डॅम्प व चिंचपाडा खदाण परिसरातील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने वेळोवेळी अत्याचार केले. दरम्यान, पीडिता २ महिन्यांची गर्भवती राहिल्याचे तिच्या घरच्यांना समजताच घरच्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी आरोपी महेश याच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन काही तासातच अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे करत आहेत.