ठाणे - 'आगोदर जेवण कर, नंतर मोबाईलवर बोल' असे वडिलांनी बजावल्यामुळे रागामध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. भुमिका नाऊ पाटील (वय - 22 रा. नारपोली) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या; अद्याप कोणालाही अटक नाही
मृत मुलगी ही मूळची भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील राहणारी होती. ती गेल्या काही वर्षांपासून ती कुटुंबासह नारपोली येथे राहत होती. युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, (कामण, ता. वसई) या कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. सोमवारी दुपारी ती जेवण करण्यासाठी बसली असताना मोबाईलवर बोलत होती. त्यावेळी वडिलांनी तिला जेवताना फोनवर संवाद करू नको असे बजावले. याचा तीला राग आल्याने स्वत:च्या खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
बराच वेळ झाला तरी मुलगी रूममधून बाहेर का येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली झाल्यानंतर, घरच्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये बघितले असता ती पंख्याला लटकल्याचे दिसून आले. त्यावेळी कुटुंबीयांनी तीला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
हेही वाचा - अमेरिकन डॉलरची चोरी करणाऱ्या आरोपीला हैदराबादमधून अटक