महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस असल्याचे भासवत २१ वर्षीय तरुणीशी केला विवाह, भामटा पोलीस गजाआड - fraud police

आरोपीने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मुलीच्या घरच्यांशी बोलणी सुरू केली होती. त्यावेळी आपण मुंबई पोलीस दलात क्राईम ब्रान्चमध्ये पोलिस शिपाई या पदावर कार्यरीत असल्याचे सांगितले. मुलीच्या घरच्यांना दाखवण्यासाठी त्याने पोलीसांचा गणवेश परिधान केलेला फोटो काढला होता.

आरोपी किरण शिंदे

By

Published : May 7, 2019, 3:20 AM IST

ठाणे - आपण मुंबई पोलीस दलातील क्राईम ब्रान्चमध्ये शिपाई पदावर कार्यरत अल्याची बतावणी करत एका भामट्याने २१ वर्षीय तरुणीची फसवणूक करुन तिच्याशी विवाह केल्याची घटना घडली आहे. किरण शिंदे असे त्या भामट्याचे नाव आहे. तरी सदर भामट्याला अटक करण्यात आली असून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस असल्याचे भासवत २१ वर्षीय तरुणीशी केला विवाह, भामटा पोलीस गजाआड

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किरण हा बदलापूर पुर्व परिसरात राहतो. अंबरनाथ पुर्व परिसरात राहणाऱया २१ वर्षीय तरुणीशी विवाह करण्यासाठी आरोपीने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मुलीच्या घरच्यांशी बोलणी सुरू केली होती. त्यावेळी आपण मुंबई पोलीस दलात क्राईम ब्रान्चमध्ये पोलिस शिपाई या पदावर कार्यरीत असल्याचे सांगितले. मुलीच्या घरच्यांना दाखवण्यासाठी त्याने पोलीसांचा गणवेश परिधान केलेला फोटो काढला होता. एवढेच नव्हे तर मुलीच्या घरच्यांचा विश्वास संपादन करण्याकरीता आरोपीने बनावट पोलीस खात्याचे ओळखपत्र आणि नंबर प्लेटही बनवून घेतली होती.

मुलीच्या घरच्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने डिसेंबर २०१८ ला संबंधित तरुणीशी विवाह केला. मात्र, विवाहानंतर अवघ्या चारच महिन्यात आपला पती कोणत्याही पोलीस दलात नोकरीला नसल्याचे संबंधित तरुणीला समजले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणीने थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत किरण विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी किरणला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला १९ मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.एन.सातपुते करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details