ठाणे -आज पहाटे ठाण्यातील प्रभात सिनेमा जवळील एका इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने संपूर्ण दुकानाला घेरले असून, दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम सुरू केले.
ठाण्यात इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक - ठाण्यात इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग
आज पहाटे ठाण्यातील प्रभात सिनेमा जवळील एका इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने संपूर्ण दुकानाला घेरले असून, दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम सुरू केले.
![ठाण्यात इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक fire on electric shop in thane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5774781-thumbnail-3x2-kakakaka.jpg)
शहरातील प्रभात सिनेमाजवळील जय हिंद नावाच्या इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. बऱ्याच वेळाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. पहाटेची वेळ असल्याने दुकान बंद होते, म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे स्थानिक शिवसेना नेते नितीन ढमाले यांनी सांगितले. आग ही शॉर्ट सर्किटमुळे न लागता, वरून टाकलेल्या सिगरेट मुळे लागल्याचा अंदाज माजी नगरसेवक पवन कदम यांनी वर्तवला आहे. दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील ताडपत्र्या काढून टाकाव्यात जेणेकरून असे प्रकार पुन्हा होणार नाहीत असे कदम म्हणाले. यामध्ये जर कोणी दोषी आढळले तर दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन स्थानिक नगरसेविका पल्लवी कदम यांनी सांगितले. झालेल्या नुकसानाचा अंदाज घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.