ठाणे - ठाण्याच्या मॉडेला चेकनाका परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईटवर सॅम्पल प्लाटची निर्मिती सुरू असताना अचानक आग लागली. या आगीने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती संतोष कदम यांनी दिली.
हेही वाचा -कल्याणातील धोकादायक इमारतीमधील मंडपच्या साहित्याला आग
आज संध्याकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास सॅम्पल प्लाट बनविण्याचे काम सुरू असतानाच अचानक आग लागली. आगीने रौद्र स्वरूप धारण केले होते. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाचे पथक आणि अग्निशमन दलाचे पथक, २ फायर इंजिन, एक जम्बो वॉटर टँकर, एक वॉटर टँकर आणि २ रेस्क्यू वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न चालू आहे. आग नेमकी कशाने लागली याबाबत कुठलीच माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.