महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिलेवर कारमध्येच बलात्कार करणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला बेड्या - अंबरनाथ

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने पीडित महिलेला दुकानाचा गाळा दाखवण्याच्या बहाण्याने अंबरनाथमधील कानसई भागात नेले व त्यानंतर रात्रीच्या अंधारात कार निर्जनस्थळी उभी करून कारमध्येच पीडित महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी माजी नगरसेवकाला बेड्या ठोकल्या आहेत.

नगरसेवकाला बेड्या

By

Published : Aug 2, 2019, 2:20 PM IST

ठाणे - उल्हासनगर महानगरपालिकेतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने पीडित महिलेला दुकानाचा गाळा दाखवण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून तिला निर्जनस्थळी नेले. त्यानंतर या माजी नगरसेवकाने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत रात्रीच्या अंधारात कारमध्येच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्रधान पाटील, माजी नगरसेवक


याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी माजी नगरसेवकाला बेड्या ठोकल्या आहेत. प्रधान पाटील असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गायकवाड पाडा परिसरात आरोपी माजी नगरसेवक प्रधान हा राहत असुन तो बांधकाम व्यवसायिक आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे डोंबिवली येथे राहणारी महिला ब्युटीपार्लरसाठी दुकानाचा गाळा पाहिजे यासाठी आली होती, त्यावेळी आरोपी पाटील याने पीडित महिलेस वेगवेगळ्या ठिकाणचे बांधकामे सुरु असलेल्या दुकानाचे तिला गाळे दाखवले.


दरम्यान 22 जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रधान पाटील याने पीडित महिलेला दुकानाचा गाळा दाखवण्याच्या बहाण्याने अंबरनाथमधील कानसई भागात घेऊन गेला. त्यानंतर रात्रीच्या अंधारात कार निर्जनस्थळी उभी करून कारमध्येच पीडित महिलेवर बळजबरीने बलात्कार केला, आणि कोणाला घडलेला प्रकार सांगितल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे पीडित महिला भयभीत झाली होती, मात्र अखेर तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्यावर ओढावलेल्या प्रसंगाचे कथन करताच पोलिसांनी पीडित महिलेच्या जबानी वरून नराधम प्रधान पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला गायकवाड पाडा परिसरातून अटक केली आहे. सदर घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजीत सिंग बग्गा करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details