ठाणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून, उपाययोजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंब्रामधील दोघांवर भादंवि कलम अंतर्गत तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंब्रामध्ये कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - मुंब्रा धक्काबुक्की
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून, उपाययोजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंब्रामधील दोघांवर भादंवि कलम अंतर्गत तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंब्रामध्ये कौसा, चाँदनगर परिसरात कोरोना विषाणू बाबत जनजागृती करण्यासाठी खासगी वाहनावर मनपाचे वाहनाचे स्टीकर लावून लोकांना सुचना ऐकू जाव्यात म्हणून, स्पीकर लावून लोकांनी रस्त्यात गर्दी करु नये, आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, नाका तोंडास मास लावणे आदी सूचना देत कर्मचारी गस्त घालण्यासाठी फिरत होते.
यावेळी दौलतनगर नाका चाँदनगर येथे गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकांची गर्दी दिसून आली. कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी तत्काळ येथील नागरिकांना त्याठिकाणाहून आवश्यकता शिवाय न थांबता घरी निघून जावे, गर्दी केल्याने संसर्गजन्य रोगाचा फैलाव होवू शकतो याबाबतची माहिती दिली. मात्र, अब्दुल गणी ऊर्फ मर्चट आणि डॉ. एस. एफ. रजा यांनी कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळी करुन धक्काबुकी केली.
दरम्यान, शासकीय कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या कारणस्तव अब्दुल गणी ऊर्फ मर्चट व डॉ. एस. एफ. रजा या दोघांवर संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा 1897 लागू असताना, त्याचा भंग केल्यामुळे भादवि 269, 270 अन्वये तसेच मा. आयुक्त यांचेकडील सीआरपीसी 144 (1) (3) कडील मनाई आदेशाचा भंग केला म्हणून कलम 188, 279, 270, 323, 353, 504, 506, 34 भादंवि सह संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा कलम 3 अन्वये मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.