नवी मुंबई - मनोरुग्ण असलेल्या मित्राचा मोाबईल व स्पीकर चोरून इमारतीच्या गच्चीवरुन ढकलून देत मित्रानेच खून केला आहे. ही घटना पवनेलमध्ये घडली असून या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कोणाला कळू नये म्हणून केला खून
प्रथमेश रमेश राणे (वय 19 वर्षे), असे मृत तरुणाचे नाव असून आदित्य शेकोटे (वय 18 वर्षे), असे खून केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पनवेल येथील साईनगर भागात हरभजन सिंग नावाची एक बंद अवस्थेत असलेली इमारत आहे. त्या इमारतीच्या गच्चीवर आदित्यने प्रथमेशला नेले. त्यानंतर त्याचा मोबाईल व स्पीकर चोरला याबाबत प्रथमेशने कोणाला सांगू नये या उद्देशाने आदित्यने प्रथमेशला इमारतीच्या गच्चीवरून ढकलून दिले.