ठाणे- महापालिकेच्या बाळकूम येथील ग्लोबल रुग्णालयातील एका ७२ वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्धाने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
माहिती देतान 'ईटीव्ही भारत' प्रतनिधी चार दिवसापूर्वी रुग्णाला ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी अचानक त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली? तेव्हा आयसीयूमध्ये कोणी उपस्थित नव्हते का? सुरक्षा रक्षक कुठे गेले होते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
रुग्णालय आधीच वादग्रस्त
ग्लोबल रुग्णालय हे आधीच वादग्रस्त आहे. आता या प्रकारानंतर रुग्णालयाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला असून ठाणे महापालिकेकडून अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. तर, याप्रकरणी प्रशासनाची चूक असेल तर याबाबत कारवाई झाली पाहिजे. या सर्व प्रकरणात चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नगरसेवक संजय भोईर यांनी केली आहे.
हेही वाचा-अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीत गॅस गळती; परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा त्रास