महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 24, 2019, 9:57 PM IST

ETV Bharat / state

खेळण्याच्या बहाण्याने नेवून ९० हजारात विक्री केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत

भिवंडीत सहा महिन्यांच्या बाळाला शेजाऱ्यांना ९० हजार रुपयांना विकल्याची घटना घडली. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे बाळाची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फरीदा अन्सारी या महिलेला अटक केली.

विक्री केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत
विक्री केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत

ठाणे - बोलता न येणाऱ्या दांपत्याच्या सहा महिन्यांच्या बाळाला ९० हजार रुपयांना विकल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे बाळाची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी फरीदा अन्सारी(वय - ४०) आणि तिचा मुलगा तौफिक(वय - १७) या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी फरीदाला अटक केली असून मुलगा तौफिक फरार झाला आहे.

विक्री केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत


अरमान इस्तियाक अन्सारी(वय - ६ महिने) असे अपहरण होऊन सुटका झालेल्या बाळाचे नाव आहे. अस्मा अन्सारी (वय-३०) आणि इस्तियाक अन्सारी (वय -३५) हे दाम्पत्य भिवंडीतील फातमानगरमध्ये राहते. दोघांनाही बोलता येत नाही. याचा फायदा शेजारी राहणाऱ्या फरीदा आणि तिचा मुलगा तौफिक यांनी घेतला. बाळाला खेळवण्याच्या बहाण्याने घरातून घेऊन गेले.

हेही वाचा - कल्याण-डोंबिवली लोकल वाहतूक ऐन ख्रिसमस दिवशी राहणार बंद, काही गाड्या रद्द

दरम्यान त्यांनी ठाण्यातील घोडबंदर रोडवरील डोंगरीपाडा येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला या बाळाचे आई-वडील खूपच गरीब आहेत, असे सांगितले. त्यांना हे बाळ दत्तक घेण्याची विनंतीही केला. त्यांनीही आरोपी महिलेवर विश्वास ठेवून त्या बाळाला ९० हजार रुपयात घेण्याची तयारी दर्शवली. २२ डिसेंबरला या बाळाची विक्री करण्यात आली.


दरम्यान, आई-वडिलांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात शेजाऱ्यांनी बाळाचे अपहरण केल्याची तक्रार दिली. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन पाटील यांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवली. अपहरणकर्ती फरीदा अन्सारीला ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपीने आपला गुन्हा कबुल केला.


यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने कासरवडली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या मदतीने घोडबंदर रोडवरील डोंगरीपाडा येथून बाळाची सुखरूप सुटका केली. अटकेत केलेल्या आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले असता २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्या फरार मुलाचा पोलीस शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details