महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विजेचा धक्का लागून नऊ कामगार गंभीर; ४० तास उलटूनही घटनेची नोंद नाही - workers injured high voltage electric shock

एका कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या कामगांरांना विद्युत वाहिनाचा शॉक लागल्याने ते कामगार जखमी झाले आहेत. मात्र, या प्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. हे सर्व जखमी कामगार आदिवासी पाड्यातील रहिवासी आहेत.

विजेचा धक्का लागून नऊ कामगार गंभीर;
विजेचा धक्का लागून नऊ कामगार गंभीर;

By

Published : Dec 28, 2020, 11:15 AM IST

Updated : Dec 28, 2020, 11:39 AM IST

ठाणे - एका कंपनीच्या गोदामात काम करणारे नऊ आदिवासी कामगार उच्च दाब असलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील वाशेरे गावाच्या हद्दीतील गोदामात शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. मात्र रविवारी रात्री उशिरापर्यत या घटनेबाबत पडघा पोलीस ठाण्यात नोंद केली नाही. यामुळे श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा सापटे यांनी पडघा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यासाठी तक्रारी अर्ज दिला आहे. तर सर्व नऊ जखमी कामगारांना भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

विजेचा धक्का लागून नऊ कामगार गंभीर

पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडून ४० तास उलटून देखील याप्रकरणी कुठलीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वसंत चिबडे, अनंत भोरे, हितेश भोरे, सुनील भोरे, विशाल रान डा दिनेश वाघ राहणार दाभाड, अनंत दिवे ,विशाल भोईर व अजय निखंडे असे जखमी कामगारांचे नाव आहे.

काम करताना विजेचा जोरदार धक्का बसला ..

भिवंडी तालुक्यातील एका कंपनीच्या गोदामात कामगार शनिवारी सकाळच्या सुमारास काम करत असताना त्यांच्या हातून धातूची शिडी कंपनीतील उच्च दाब असलेल्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यात ते फेकले गेले. यावेळी काही कामगार भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती अशोक सापटे यांनी दिली. या अपघातात वसंत चिबडे, अनंत भोरे, हितेश भोरे, सुनील भोरे, विशाल रानडा हे सर्व जव्हार येथील रहिवाशी आहेत, तर दिनेश वाघ (दाभाड), तसेच अनंत दिवे(खंबा-कुशिवलीच) आणि विशाल भोईर व अजय निखंडे हे मेठ येथील रहिवाशी आहेत. त्यांना भिवंडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांची घटनेची नोंद करण्यास टाळाटाळ ?

कामगार जखमी झाल्याची घटना पडाघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश काटके यांनी घटनेची पुष्टी केली आहे. परंतु पोलिसांना अद्याप या संदर्भात कोणाविरूद्ध कोणतीही तक्रार मिळालेली नाही, तसेच कामगारांचे कंत्राटदार स्वत: संपूर्ण प्रकरण हाताळत होते, असे सांगितले. तर या घटनेची माहिती मिळताच पीडित कामगारांचे जबाब नोंदविण्यासाठी आम्ही पोलिस पथक पाठवले आहे. अशी माहिती पोलीस अधिकारी कोकाटे यांनी दिली आहे. परंतु घटना घडून ४० तास उलटून देखील याप्रकरणी कुठलीच कारवाई न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Last Updated : Dec 28, 2020, 11:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details