ठाणे:हा भामटा कल्याण पश्चिम भागात पारनाका येथील मेघश्याम प्रसाद या हायप्रोफाईल सोसायटी राहतो. तर तक्रारदार अविनाश श्रीधर कुलकर्णी हे सेवानिवृत्त असून ते पुणे येथील कात्रज बिबवेवाडी परिसरात कुटुंबासह राहतात. त्यातच २०२२ साली तक्रारदार कुलकर्णी यांची ओळख आरोपी परांजपे याच्याशी झाली होती. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत डिसेंबर २०२२ मध्ये कुलकर्णी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला वर्षाला ८० टक्के व्याज मिळवून देतो, असे आमिष परांजपे याने दाखवले होते. कुलकर्णीसह कल्याण मधील ३२ गुंतवणूकदारांनी दोन वर्षांपूर्वी आरोपी परांजपेवर विश्वास ठेवून पैशाची गुंतवणूक केली.
पैसे देण्यास टाळाटाळ:डिसेंबर २०२२ ते आतापर्यंत या सर्व गुंतवणूकदारांनी एकूण ९ कोटी ९ लाख ६४ हजार ५०० रुपये आरोपी परांजपे याला ऑनलाईन ट्रान्सफर केले. दरम्यान, काही महिने झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी आरोपी परांजपेकडे वाढीव व्याज मागण्यास सुरुवात केली; मात्र परांजपे चालढकल करत होता. विशेष म्हणजे वर्ष उलटले तरी आरोपी दर्शन परांजपे हा वाढीव व्याज देत नव्हता. त्यामुळे तक्रारदारांनी मूळ रक्कम परत करण्याची मागणी सुरू केली. मात्र ती रक्कमही परत करण्यास आरोपी परांजपे टाळाटाळ करू लागला होता.