नवी मुंबई -उपनगरात कोरोनाचा कहर वाढत असून, दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढतचं आहे. मंगळवारी नवी मुंबईत 77 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आत्तापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत हा आकडा सर्वाधिक आहे.
अत्यावश्यक सेवेत आणि एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र नवी मुंबईत आहे. यामुळे पालिका प्रशसनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. नवी मुंबई शहरात आत्तापर्यंत 867 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी आहेत. 7 हजार 157 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यातील 4 हजार 857 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 1 हजार 444 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे.