महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कचऱ्याचे साम्राज्य कायम; तरीही ठाण्यातील नाले सफाई 75 टक्के पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा - Cleanliness

ठाणे शहरातील नालेसफाई 65 ते 75 टक्के पूर्ण झाली असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र, पालिका आयुक्तांनी नालेसफाईच्या दौऱ्यातच काही नाले कचऱ्याने आणि गाळाने भरले असल्याचे निदर्शनास आले आहे.

ठाणे शहरांतील नाले सफाई ७५%

By

Published : May 31, 2019, 5:54 PM IST

ठाणे - पावसाळा तोंडावर आला आहे. तत्पूर्वी ठाणे शहरातील नालेसफाई 65 ते 75 टक्के पूर्ण झाली असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र, पालिका आयुक्तांनी केलेल्या नालेसफाईच्या दौऱ्यातच काही नाले कचऱ्याने आणि गाळाने भरले असल्याचे निदर्शनास आले आहे.

शहरातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामांच्या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी काही सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी कितपत करण्यात येत आहे, हे पाहण्यासाठी आयुक्तांनी तीन दिवस पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी पालिका अधिकाऱ्यांसोबत मेट्रोचे अधिकारीदेखील उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान, शहरातील वागळे रोड नं. २२ येथील नाला, तसेच जवळपासच्या अंतरावरील असलेल्या काही नाल्यातून काढण्यात आलेला सर्व गाळ मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला पडला असल्याचे निदर्शनास आले. सावरकरनगर येथील नालातर अक्षरशः गाळानेच भरला असून, या ठिकाणी रोबोटिक मशिनच्या माध्यमातून सफाई करण्यात येत आहे. २ जूनपर्यंत पहिल्या टप्प्याची नालेसफाई पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा आयुक्तांकडून करण्यात येत असला तरी,सध्या नालेसफाईचा जो वेग आहे त्यावरून हा दावा खरा ठरेल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

ठाणे शहरांतील नाले सफाई ७५%

या पाहणी दौऱ्यात अनेक नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा आढळून आला. ठेकेदाराकडून नाल्याची सफाई समाधानकारक झाली नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच अनेक ठिकाणी नाल्यातील गाळ रस्त्यावरच टाकल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, पावसाळ्यात एमएमआरडीएने देखील स्वतःची सुरक्षा यंत्रणा राबवावी. तसेच महावितरण कंपनीने तीन भागात काम करण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत मागितली असून ती त्यांना देण्यात आली आहे. मात्र, शहरात नवीन खड्डे न खोदण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details