महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईत 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले; बाधितांची संख्या 1059 वर

नवी मुंबईत शुक्रवारी 74 रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांची संख्या 1059 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 272 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे.नवी मुंबई मध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे.

corona in new mumbai
नवी मुंबईत 74 पॉझिटिव्ह रुग्ण

By

Published : May 16, 2020, 7:38 AM IST

नवी मुंबई- कोरोनाचा कहर नवी मुंबईत वाढत असून, दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी शहरात 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आकडा हा सर्वाधिक आहे. शहरात आतापर्यंत 1059 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात आतापर्यंत 1059 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आतापर्यंत नवी मुंबईत 7844 लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 5848 जण निगेटिव्ह आले असून,948 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1048 इतकी आहे.

शुक्रवारी तुर्भे मधील 14, बेलापूर मधील 2, कोपरखैरणे मधील 19, नेरुळ मधील 18 व वाशीतील 4, घणसोली मधील 13, ऐरोली मधील 2 व दिघ्यात 2 असे एकूण 74 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरात 1048 इतका कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झाला आहे.

आतापर्यंत नवी मुंबईत 272 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. नेरूळ मधील 1 बेलापूरच्या 2 ,वाशीमधील 4, तुर्भे येथील 5 ,कोपरखैरणे मधील 2, घणसोलीतील 3 अशा एकूण 17 व्यक्ती आज कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. शहरात सद्यस्थिती मध्ये 753 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून दिवसभरात कोरोनामुळे 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details