ठाणे - जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये नोटाची चलती दिसून आली. उमेदवार पसंतीचा नसेल तर मतदान यंत्रावर नोटा हा पर्याय असतो. यंदाच्या निवडणुकीत ठाण्यात तब्बल 72 हजार मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.
ठाणे जिल्ह्यात तब्बल 72 हजार मतदान नोटाला; उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीला फटका - नोटा मतदान ठाणे
उमेदवार पसंतीचा नसेल तर मतदान यंत्रावर नोटा हा पर्याय असतो. यंदाच्या निवडणुकीत ठाण्यात तब्बल 72 हजार मतदारांनी हा पर्याय निवडला आहे. या नोटा पर्यायाचा फटका उल्हासनगर मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा -ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघातील मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीचा फायदा युतीला?
या नोटा पर्यायाचा फटका उल्हासनगर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी अवघ्या 2 हजार मतांनी पराभूत झाल्या आहेत. या मतदार संघात 4 हजार 978 जणांनी नोटा पर्याय स्वीकारला आहे. या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 6 हजार 82 जणांनी नोटा पर्याय स्वीकारलला आहे. ज्योती कलानी उभ्या असलेल्या उल्हासनगर मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी निवडून आले असून येथे 4 हजार 978 मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केल्याचे उघड झाले आहे.