ठाणे - उल्हासनगर शहरात चोरट्यांची व्यापारी वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यातच पुन्हा उल्हासनगरातील डी. जी. वन इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून चोरट्यांनी 71 हजाराचे महागडे मोबाइल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनांमुळे पोलिसांच्या गस्ती विषयी प्रश्न निर्माण झाला आहे.
उल्हासनगरात चोरट्यांची दहशत; दुकान फोडून 71 हजाराचे मोबाईल लंपास - mobile shops
उल्हासनगर शहरातील वीनस चौक रोड परिसरात असलेल्या डी. जी. 1 या इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीच्या दुकानातून थोडेफार नव्हे तर तब्बल 71 हजाराचे महागडे मोबाईल चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकान फोडून लंपास केले. चोरट्यांनी सॅमसंग,व्हीवो, ओप्पो कंपनीचे महागडे मोबाईल चोरी केले.
उल्हासनगर शहरातील वीनस चौक रोड परिसरात असलेल्या डी. जी. 1 या इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीच्या दुकानातून थोडेफार नव्हे तर तब्बल 71 हजाराचे महागडे मोबाईल चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकान फोडून लंपास केले. चोरट्यांनी सॅमसंग,व्हीवो, ओप्पो कंपनीचे महागडे मोबाईल चोरी केले. चोरट्यांनी मोबाईलचे रिकामे खोके दुकानातच फेकून दे त्यातील फक्त मोबाइल लंपास केले. यामुळे दुकानांमध्ये खोक्याचा ढीग जमला होता.
खळबळजनक बाब म्हणजे ओळख पटू नये म्हणून चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही लंपास केला. त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.