ठाणे - उल्हासनगरातील एका 70 वर्षीय वृद्धाचा आज स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. संपत राऊत, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राऊत यांना एका आठवड्यापासून स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना ठाण्यातील घोडबंदर रोडच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
उल्हासनगरात 'स्वाईन फ्लू' मुळे वृद्धाचा मृत्यू, साथीच्या रोगांचा वाढतोय प्रभाव - 70 years old man died in Ulhasnagar
उल्हासनगरातील एका 70 वर्षीय वृद्धाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. संपत राऊत (वय 70) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राऊत यांना एका आठवड्यापासून स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले होते.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रात साथीच्या रोगांच्या वाढत्या प्रभावामुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. काही दिवसांपूर्वी शांतीनगर परिसरात एका 17 वर्षीय मुलाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर संपत राऊत यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. एका आठवड्यापूर्वी त्यांना उल्हासनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान केले. त्यानंतर राऊत यांना घोडबंदर येथे उपचारासाठी नेण्यात आले.
राऊत यांचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाला, याला उल्हासनगर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, मृत राऊत यांच्या नातेवाईकांसह शेजारील नागरिकांनाही स्वाईन फ्लू होऊ नये यासाठी रोग प्रतिबंधक औषधे देण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.