महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात एकाच दिवशी कोरोनाचे 7 रुग्ण; 6 वर्षाच्या मुलीला कोरोनाची बाधा - कोरोना रुग्ण

कोरोना विषाणूचा आकडा राज्यासह ठाण्यात देखील वाढत आहे. आतापर्यंत एकूण 33 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनाचा वतीने सांगण्यात आले असून, यापैकी 2 रुग्ण बरे झाले होते. तब्बल 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

covid 19 patient
ठाण्यात एकाच दिवशी कोरोनाचे 7 रुग्ण; 6 वर्षाच्या मुलीला कोरोनाची बाधा

By

Published : Apr 9, 2020, 11:47 PM IST

ठाणे - दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत जात असून, बुधवारी एकूण 7 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका 6 वर्षाच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान तिला त्त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा आकडा राज्यासह ठाण्यात देखील वाढत आहे. आतापर्यंत एकूण 33 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनाचा वतीने सांगण्यात आले असून, यापैकी 2 रुग्ण बरे झाले होते. तब्बल 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

यामध्ये एका 6 वर्षाच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली असल्याने तिला देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये बाधा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तिला लागण झाली असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी तिची कोरोनाची टेस्ट झाली होती. तेव्हा ती निगेटिव्ह आली. तेव्हापासून त्या मुलीला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान, पुन्हा या मुलीची टेस्ट झाली त्यात ती पॅाझिटिव्ह निघाली. मुलीला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान तिचे आई-वडिल, काका आणि आजी यांना देखील क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details