ठाणे - भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला येथील एका गोठ्यात अज्ञात मारेकऱ्यांकडून तब्बल 22 म्हशीवर सूऱ्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यापैकी 7 म्हशींचा मृत्यू झाले ( 7 buffaloes Death bandar Bhiwandi ) असून या हल्ल्यात 22 म्हशीचे गळा व पायांचा नसा सुऱ्याने कापण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नजीमपुरा पोलीस ठाण्यात म्हशींना ठार मारणाऱ्या अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
Attack On Buffalo Bhiwandi : गोठ्यात बांधलेल्या 22 म्हशींवर शस्त्राने हल्ला; 7 म्हशींचा मृत्यू 15 जखमी - गोठ्यात बांधलेल्या 22 म्हशीवर सुऱ्याने वार
गोठ्यात बांधलेल्या म्हशींवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. यात 7 म्हशींचा मृत्यू झाला ( 7 buffaloes Death bandar Bhiwandi ) असून या हल्ल्यात 22 म्हशीचे गळा व पायांचा नसा सुऱ्याने कापण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नजीमपुरा पोलीस ठाण्यात म्हशींना ठार मारणाऱ्या अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
व्यक्तीगत वादामुळे प्रकार घडल्याचा अंदाज :भिवंडीतील दूध व्यापारी अरहम मोमिन यांचा भिवंडी शहरातील बंदर मोहल्लामध्ये म्हशींचा गोठा आहे. या गोठ्यात आज ( रविवारी ) पहाटेच्या सुमारास अज्ञात मारेकरी घुसले. त्यानंतर 22 म्हशीवर सुऱ्याने हल्ला केला. या हल्ल्यात 7 म्हशींचा मृत्यू झाला आहे, तर 15 म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी असलेल्या काही म्हशी अंत्यवस्थेत असून त्यांच्यावर पशु वैद्यकीय डॉक्टरकडून उपचार सुरू आहे. याप्रकरणी अरहम मोमीन यांच्या तक्रारी वरून निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. म्हशींवरील हल्ल्याचे कारण अद्यापही समोर आले नाही. मात्र दूध व्यापाऱ्यांमधील व्यक्तीगत वादामुळे हा धक्कादायक प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.