ठाणे - विधानसभा निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी जिल्ह्यात 18 मतदारसंघामध्ये 64 उमेदवारांचे 82 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
यामध्ये 18 विधानसभा क्षेत्रांपैकी 134 भिवंडी ग्रामीण या मतदारसंघात कॉम्रेड नितेश म्हसे (भारतीय कम्युनिट पक्ष) आणि आशा मोरे (शिवसेना) या उमेदवारांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले.
135 शहापूर या मतदार संघात दौलत भिका दरोडा (राष्ट्रवादी काँग्रेस), जगदीश गोविद गिरा (अपक्ष), पांडुरंग महादू बरोरा (शिवसेना), दीक्षा दिगंबर पडवळ (अपक्ष) अशा 4 उमेदवारांनी 4 उमेदवारी अर्ज दाखल केले.
136 भिवंडी (प) मतदार संघात चौघुले महेश प्रभाकर(भाजप), मेघना महेश चौघुले (भाजपा), मोहम्मद शोएब अश्पाक खान (काँग्रेस), अशोक शांताराम भोसले (शिवसेना), मोहम्मद खलीद मुक्तार अहमद शेख (राष्ट्रवादी काँग्रेस), मोहम्मद खलीद मुक्तार अहमद शेख (अपक्ष) अशा 5 उमेदवारांनी 10 उमेदवारी अर्ज दाखले केले.
137 भिवंडी पूर्व या मतदार संघात मनोज वामन गुळवी (मनसे), वासुदेव नारायण चौधरी (अपक्ष), रुपेश लक्ष्मण म्हात्रे (शिवसेना), रवींद्र दगडू शिंदे (अपक्ष) अशा 4 उमेदवारांनी 7 उमेदवारी अर्ज दाखल केले.
138 कल्याण (प) या मतदार संघात सुनिल गंगाराम धुमाळ (अपक्ष), कौस्तुभ सतीशचंद्र बहुलेकर (अपक्ष), सजिथा जयकृष्णन नायर (अपक्ष), नोबेल बाळू साळवे (नॅशनल पिपल्स पार्टी), नीता आशिष पाटील (संभाजी ब्रिगेट) अशा 5 उमेदवारांनी 6 उमेदवारी अर्ज दाखल केले.
139 मुरबाड मतदार संघात नितीन चंद्रकांत पष्टे (भारतीय शेतकरी कामगार पक्ष), अॅड. नितीन जयवंत देशमुख (मनसे) अशा 2 उमेदवारांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले.
140 अंबरनाथ या मतदार संघात सुबोध भाऊराव भारत (अपक्ष), रोहित चंद्रकांत साळवी (राष्ट्रवादी काँग्रेस) अपेक्षा अरुण दळवी (अपक्ष) अशा 3 उमेदवारांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले.
141 उल्हासनगर मतदार संघात सिद्धार्थ रावण साबळे (आर.पी.आय, सेक्युलर), जोगेंद्र सिंग धरमराज खुसर (अपक्ष), रविंद्र अभिमन्यू केणे (अपक्ष), राजेश लिलाराम चांदवाणी (अपक्ष), इम्ब्राहीम अब्दुल सत्तार अन्सारी (अपक्ष), ज्योती सुरेश कलानी (राष्ट्रवादी काँग्रेस), ज्ञानेश्वर दत्तात्रय लोखंडे (अपक्ष) अशा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.