ठाणे :जिद्द प्रेम आणि आवड असल्यास काहीही शक्य होऊ शकते हे एका ज्येष्ठ नागरिकाने पुन्हा एकदा दाखवून दिले ( tribute to wife death while climbing ) आहे. गिर्यारोहणादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. तिला श्रद्धांजली देण्यासाठी आणि मनात असलेली जिद्द दाखवण्यासाठी माउंट विन्सन'सर ( Climb Mount Vinson Antarctica Highest Peak ) केले. यामुळे ठाणे करांची मान अभिमानाने उंचावली आहे.
वयाच्या साठाव्या वर्षी गिर्यारोहण : ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक तसचे गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांनी वयाच्या साठाव्या वर्षी अंटार्टिकातील सर्वोच्य शिखर 'माउंट विन्सन'सर करून एक नवा विक्रम प्रस्थापित (60 year old man Climb Mount Vinson ) केला. 16 डिसेंबर 2022 रोजी वयाच्या साठाव्या वर्षी अत्यंत कठीण असणारे शिखर सर करणारे भारतातील पहिले गिर्यारोहक ठरले ( Sharad Kulkarni Mount Vinson Climb ) आहेत.
हवामानाची चांगली साथ : या आधी जून 2022 मध्ये नॉर्थ अमेरिकेतील अलास्कामधील 'माउंट देणाली' हे अत्यंत कठीण असणारे शिखर सर करणारे ते पहिले ज्येष्ठ गिर्यारोहक ठरले होते. अंटार्टिकातील 4892 मीटर उंचीचे हे शिखर उंचीच्या दृष्टीने जास्त नसले तरी, अतीशय थंड आणि सतत बदलणारे लहरी हवामान, लो कँपवरून हाय कँपकडे जाताना जवळ जवळ एक किलोमीटर पेक्षा उंच तांत्रीक पद्धतीने चढावी लागणारी बर्फाची अंगावर येणारी उभी भिंत, शिखरावर असणारे मायनास 40° च्या जवळ असणारे तापमान.ह्या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी आव्हानात्मक होत्या. त्यात सुरुवातीलाच दोन दिवस प्रचंड बर्फाचा वादळामुळे त्यांचे दोन दिवस वाया गेले होते. पण नंतर त्यांच्या नशिबाने मोहिम पूर्ण करेपर्यंत हवामानाने त्यांना चांगली साथ दिली. कारण त्याआधी दोन दिवस पुढे गेलेले सहा गिर्यारोहक लो कँपलाच अडकून पडले होते. तेथे एकदा बर्फाच्या वादळाला सुरूवात झाली की ते सात - आठ दिवसापर्यंत पण चालू राहू शकते असे वातावरण त्या ठिकाणी असते.
ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे मृत्यू :शरद कुलकर्णी आणि त्यांची पत्नी अंजलीने जगातील सात खंडातील सात सर्वोच्य शिखरे 'सेवन समिट' सर करण्याचे स्वप्न पाहिले होते. या स्वप्नाची पूर्तता करताना 2019 साली माऊंट एव्हरेस्ट सर करत असताना त्यावेळी झालेल्या प्रचंड ट्रॅफिकजाममुळे ऑक्सीजनच्या कमतरते अभावी तेथील 28800 फुटांवर असेलल्या हिलरी स्टेप खाली त्यांची पत्नी अंजली कुलकर्णी यांचा मृत्यू झाला ( Woman dies while climbing ) होता. त्या मानसिक धक्यातून सावरत शरद कुलकर्णी यांनी उरलेली चार शिखरे सर करून आपल्या पत्नीला आदरांजली वाहण्याचे ठरवले होते. याशिवाय या आधी त्यांनी नेपाळ मधील माऊंट लोबुचे, मेरा पीक तसेच भारतातली हनुमान टिब्बा, स्तोक कांगरी इत्यादी शिखरे सर केली ( Mount Vinson Antarctica Highest Peak ) आहेत.