नवी मुंबई - नवी मुंबईत कोरोनाचा कहर कमी होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली, तरी मृतांचा आकडा मात्र वाढत आहे. आज दोघांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ७७ वर पोहोचला आहे. तसेच आज नवी मुंबईत 58 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सकारात्मक बाब म्हणजे आजच 16 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
नवी मुंबईत 58 कोरोनाचे नवे रुग्ण, तर 16 जणांना डिस्चार्ज - नवी मुंबई कोरोना पॉझिटिव्ह केसेस
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबईने धोक्याची पातळी ओलांडली. नवी मुंबईत आत्तापर्यंत 1433 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबईने धोक्याची पातळी ओलांडली. नवी मुंबईत आत्तापर्यंत 1433 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी आहेत. आत्तापर्यंत नवी मुंबईत 9419 लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 7377 जण निगेटीव्ह आले असून, 920 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1422 इतकी आहे. आज 58 जण आज (21मे ) कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर 16 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 77 व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.