नवी मुंबई - कोरोनाचा कहर वाढत असून, दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवारी नवी मुंबईत 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत बुधवारचा आकडा हा सर्वाधिक आहे.
नवी मुंबईत 54 कोरोनाचे नवे रुग्ण, एकूण आकडा 910 - total 910 corona patient in navi mumbai
शहरात आतापर्यंत 921 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आतापर्यंत नवी मुंबईत 7 हजार 390 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 5 हजार 167 जण निगेटिव्ह आले असून,1 हजार 313 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्रं नवी मुंबईत असून, यामुळे पालिका प्रशसनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहरात धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात आतापर्यंत 921 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आतापर्यंत नवी मुंबईत 7 हजार 390 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 5 हजार 167 जण निगेटिव्ह आले असून,1 हजार 313 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 910 इतकी आहे. बुधवारी 54 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून तुर्भेमधील 14, बेलापूरमधील 2, कोपरखैरणेमधील 10, नेरुळमधील 2 व वाशीतील 11, घणसोली मधील 5, ऐरोलीमधील 9 व दिघ्यात 1 असे एकूण 54 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत नवी मुंबईत 202 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. बुधवारी बेलापूरमधील 3, नेरूळमधील 5 , वाशीमधील 7, तुर्भे येथील 4 ,कोपरखैरणेमधील 3, घणसोलीमधील 7, व दिघ्यामधील 2 अशा एकूण 31 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. शहरात सद्यस्थितीमध्ये 689 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.