महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तळोजा वसाहतीत महिलेची भरदिवसा हत्या, स्वयंपाकघरात मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात - panvel crime

तळोजा वसाहतीतील एका 50 वर्षीय महिलेची हत्या झाली असून तिचा मृतदेह स्वयंपाकघरात सापडला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा वसाहतीत एका 50 वर्षीय महिलेचा खून झाल्याची आज घटना घडली आहे. रेखा शर्मा असे या महिलेचे नाव आहे. ती तळोजा सेक्टर 11 मधील मेट्रो पॉईंट या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास होती.

पनवेल क्राइम
तळोजा वसाहतीत महिलेची भरदिवसा हत्या...स्वयंपाकघरात मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

By

Published : Aug 25, 2020, 8:47 AM IST

नवी मुंबई - तळोजा वसाहतीतील एका 50 वर्षीय महिलेची हत्या झाली असून तिचा मृतदेह स्वयंपाकघरात सापडला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा वसाहतीत एका 50 वर्षीय महिलेचा खून झाल्याची आज घटना घडली आहे. रेखा शर्मा, असे या महिलेचे नाव आहे. ती तळोजा सेक्टर 11 मधील मेट्रो पॉईंट या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास होती.

घरात कोणीही नसताना रेखा शर्मा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हल्लेखोर फरार झाला आहे. मृत महिला रक्ताच्या थारोळ्यात घराच्या स्वयंपाक गृहात आढळून आली. सकाळच्या सुमारास संबंधित घटना समोर आली असून रेखा यांचे नातेवाईक घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय.

घटनास्थळी परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे आणि तळोजा पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ दाखल झाले. मृत रेखा यांच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू झाला आहे. सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात पोलीस व्यग्र आहेत. तसेच शेजारी आणि नातेवाईक यांच्याकडेही चौकशी सुरू आहे. रेखा यांच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून तळोजा पोलीस पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details