ठाणे - डोंबिवली शहरातील भोईरवाडीमधल्या सिताई नगरमध्ये राहणारा सिद्धार्थ गणेश कानंगट्ट या ५ वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
खेळत असताना अचानक झाला बेपत्ता -
मृत सिद्धार्थ हा गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. त्यामुळे घरच्यांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र कुठेही आढळून आला नाही. नातेवाईक शोध घेत असतानाच तो राहत असलेल्या घराजवळच्या विहिरीत पाहिले असता त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. तत्काळ त्याला बाहेर काढल्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
हेही वाचा -वर्धा नदी बोट दुर्घटना, 11 पैकी 10 जणांचे मृतदेह सापडले