महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Parrots Turtles Rescued : वनविभागाच्या धडक कारवाईत ५ पोपट, दुर्मिळ १६ स्टार ब्लॅक कासवांची सुटका; तीन आरोपी गजाआड - पोपट आणि कासवांची सुटका

घरात धनसंपत्ती यावी, धनाढ्य होण्यासाठी गैरसमजुतीतून अंधश्रद्धेपोटी दुर्मिळ वन्य प्राण्यांना पाळून त्यांची बेकायदेशीर विक्री (Illegal sale of rare wild animals) करणाऱ्या तीन जणांना वनविभाग आणि वर्ल्डवाईड क्राईम कंट्रोल ब्युरोच्या पथकांनी संयुक्त कारवाईत २० डिसेंबर, २०२२ रोजी अटक (three arrested in sale of wild animals) केलेली आहे. मालाड आणि क्रॉफेट मार्केट या दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत पथकाने पाच पोपट आणि १६ दुर्मिळ ब्लॅक स्टार कासव यांची सुटका (Parrots Turtles Rescued) केली. अटक तीन आरोपीना बुधवारी न्यायालयात हजार करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी ठाणे राकेश भोईर यांनी दिली.

Parrots Turtles Rescued
पोपट आणि कासव जप्त

By

Published : Dec 21, 2022, 7:25 PM IST

पोपट आणि कासव जप्तीवर वनअधिकाऱ्याचे मत

ठाणे :वनविभाग ठाणे आणि वर्ल्डवाईड क्राईम कंट्रोल ब्युरो यांच्या संयुक्त कारवाईत प्रथम मालाड पूर्व येथे छापेमारी करीत आरोपी प्रमोद शिवसुरत पाल याला अटक करून एक पोपट आणि ७ दुर्मिळ ब्लॅक स्टार कासव हस्तगत (Parrots Turtles Rescued) केले. अटक आरोपीने दिलेल्या म्हणीनुसार त्याने सादर प्राणी हे क्रॉफेट मार्केट येथून घेतल्याचे समजले. पथकाने क्रॉफेट मार्केट मधील प्राणी विक्री (Illegal sale of rare wild animals) करणाऱ्या शकील खान आणि दीपक म्हात्रे याना अटक केली. त्यांच्याकडून ४ पोपट आणि ९ ब्लॅक स्टार कासव हस्तगत केले. वनविभागाच्या या संयुक्त कारवाईत पथकाने ३ आरोपी आणि १६ दुर्मिळ ब्लॅक स्टार कासव आणि पाच पोपट हस्तगत केले. (three arrested in sale of wild animals)

रानटी पोपट

अंधश्रद्धेतून प्राण्यांवर अत्याचार :अटक आरोपीना आज (२१ डिसें) रोजी न्यायालयात नेणार असल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी ठाणे राकेश भोईर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि, घरात धनप्राप्तीसाठी अशा प्रकारे वन्यप्राणी पाळतात. नागरिकांनी अंधश्रद्धेमध्ये अडकू नये. अन्यथा त्यांच्यावर वन्यप्राणी अधिनियम १९७२ नुसार कारवाई होईल असे आवाहन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details