ठाणे - कल्याणमधील टिटवाळा येथे वासुंद्री गावाजवळ देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले चार तरुण काळू नदीपात्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणांचा अद्याप शोध सुरू असून, स्थानिक पोलीस प्रशासन व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला असून, विश्वास पवार, रुपेश पवार, सिध्देश पारटे, सुमित वायदंडे अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.
ठाण्यात देवीच्या विसर्जनासाठी गेलेले 4 तरुण काळू नदीत बुडाले - thane durga visarjan
कल्याणमधील टिटवाळा येथे वासुंद्री गावाजवळ देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले चार तरुण काळू नदीपात्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणांचा अद्याप शोध सुरू असून, स्थानिक पोलीस प्रशासन व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
देवीच्या विसर्जनासाठी गेलेले 4 तरुण नदीपात्रात बुडाले
टिटवाळ्यातील जानकी विद्यालयाच्या शेजारील एका चाळीत नवरात्री निमित्त देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. याच देवीचे विसर्जन करताना काळू नदीच्या पात्रात चार तरूण बुडाल्याची घटना घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस व कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाकडून काळू नदीच्या पात्रात बेपत्ता झालेल्या चारही तरुणाचा शोध सुरू आहे.
Last Updated : Oct 10, 2019, 12:08 PM IST