मीरा भाईंदर(ठाणे)-शौचालयाच्या टाकीत पडून चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काशीमीरा परिसरात घडली आहे. दिवाळीच्या निमित्ताने काशीमीरा परिसरतल्या पुलाखाली लहान मुले फटाके फोडत होते. त्यावेळीही घटना घडली. रविवारी सायंकाळच्या सुमाराही घटना घडली आहे. आसिफा मुस्तफा अन्सारी असे मृत मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी घेतला शोध-
मीरा भाईंदर शहरातील काशीमीरा परिसरातील निलकमल नाका जवळ नवीन शौचालय बांधण्यात आले आहे. त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या ठिकाणी रविवारी सायंकाळी लहान मुले फटाके फोडत होते. सर्व मुले फटाके फोडून घरी परतले. मात्र, त्यांच्यासोबतच फटाके फोडणारी आसिफा अन्सारी घरी आलीच नाही. त्यामुळे तिचा शोध सुरू केला. त्यानंतर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिलांनी काशीमीरा भागाची पाहणी केली असता, पुला खाली असलेल्या शौचालयांच्या टाकीत आफिफाचा मृतदेह आढळून आला.