ठाणे- दुचाकीला धक्का लागल्याच्या वादातून दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने ४ जणांवर हल्ला केला. उल्हासनगरातील निलम हॉटेलसमोर हा प्रकार घडला आहे. ही घटना भरस्त्यात घडल्याने एकच खळबळ उडाली. या हल्ल्याचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
ठाण्यात भररस्त्यावर टोळक्याच्या हल्ल्यात ४ जण जखमी - ठाणे गुन्हे बातमी
हॉटेल समोर रस्त्यावर काल रात्री साडे १२ च्या सुमारास उभी असलेल्या केटीएम दुचाकीवर जसबीर लभाना हा बसला होता. त्याच्याकडून ती दुचाकी खाली पडली होती. यावेळी हे प्रकरण घडले.
हेही वाचा-'आम्ही नवरदेव असून ज्या नवरीशी लग्न कर म्हणेल त्याच नवरीशी करणार'
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. उल्हासनगर शहरातील १७ सेक्शन परिसरात निलम हॉटेल आहे. या हॉटेलसमोर रस्त्यावर काल रात्री साडे १२ च्या सुमारास उभ्या असलेल्या केटीएम दुचाकीवर जसबीर लभाना हा बसला होता. त्याच्याकडून ती दुचाकी खाली पडली. त्यावेळी केटीएम या दुचाकीचा मालक व त्याचे साथीदार यांच्यासोबत जसबीर हा बोलत होता. त्यावेळी अचानक दुचाकीवरून ६ ते ७ जणांचे टोळके लाकडी दांडके, लोखंडी रॉड व चाकू घेऊन त्या ठिकणी आले. त्यांनी संजू लभाना, अमर लभाना, जसबीर लभाना व नवनीत चौरासीया यांच्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. तसेच संजू लभाना यांच्या स्कुटरची तोडफोड करुन त्याचे नुकसान केले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ६ ते ७ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस तुकाराम शेळके करीत आहेत.