कल्याण डोंबिवलीतून परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या 344 विद्यार्थ्यांचे लसीकरण - vaccination in kalyan dombivali
ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या 344 विद्यार्थ्यांच्या कोविशिल्ड लसीच्या पहिल्या मात्रेची प्रक्रिया 2 आणि 3 जून रोजी पार पडली आहे.
45 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण
उद्या म्हणजेच 4 जून रोजी प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र कल्याण (पूर्व) महानगरपालिकेच्या नेतीवली दवाखान्याच्या बाजूला आणि सावळाराम क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली (पूर्व) या दोन लसीकरण केंद्रावर" कोव्हॅक्सिन लसीच्या केवळ दुसऱ्या मात्रे साठी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि 45 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरणाची व्यवस्था सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5. वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे. तर कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 28 दिवस पूर्ण झाल्यावर घ्यावयाचा आहे.
4 लसीकरण केंद्रांवर उद्या कोविशिल्ड लसीकरण
महापालिका हद्दीतील उर्वरित 19 लसीकरण केंद्रांवर उद्या कोविशिल्ड लसीची पहिली व दुसरी मात्रा सकाळी दहा वाजल्यापासून लससाठा उपलब्ध असेपर्यंत देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या 19 लसीकरण केंद्रापैकी खाली नमूद केलेल्या 4 लसीकरण केंद्रावर केवळ 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑफलाईन टोकन पध्दतीने लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
1. जरीमरी विद्या मंदिर शाळा, कल्याण पूर्व
2. विद्या मंदिर शाळा, मांडा टिटवाळा
3.वाणी विद्यालय, कल्याण(प)
4 डॉन बास्को विद्यालय, डोंबिवली (प)
18-44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंदच
केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने कोविशिल्ड लसीचा प्रथम डोस घेतल्यानंतर दुसरा डोस देण्याचा कालावधी 6 ते 8 आठवडयावरुन 12 ते 16 आठवडे असा केला असल्याने कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन 84 दिवस झाले असतील अशा नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस मिळणार आहे. सदर कालावधी पूर्ण झाला नसल्यास लस मिळणार नसून नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या सूचनेनुसार 18-44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत स्थगित ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.