नवी मुंबई - राज्यातील किनारपट्टी भागातील अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात निसर्ग चक्रीवादळ धडकले. या वादळाचा परिणाम पनवेल शहर व नवी मुंबईवरही दिसून येत आहे. नवी मुंबई परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठी वृक्ष उन्मळून पडली आहेत. तसेच काही भागात विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे.
निसर्ग चक्रीवादळ : नवी मुंबईत मुसळधार पाऊस, ३३ वृक्षांची पडझड
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे. नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सध्या नवी मुंबईच्या खाडी किनारपट्टी भागात ताशी १०० हून अधिक वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. नवी मुंबईत काही घरांवरील व इमारतीच्या गच्चीवरील पत्रेही उडाले आहेत.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे. नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सध्या नवी मुंबईच्या खाडी किनारपट्टी भागात ताशी १०० हून अधिक वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. नवी मुंबईत काही घरांवरील व इमारतीच्या गच्चीवरील पत्रेही उडाले आहेत. सर्व परिस्थिती पाहता नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. रमेश मेटल काॅरी, नेरूळ या ठिकाणाहून १२५ नागरिकांना सारसोळे येथील महानगरपालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले. त्यांच्या निवाऱ्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बेलापूर विभागातील दुर्गामाता संभाजीनगर येथील एकूण ६६ नागरिकांना बेलापूर सेक्टर ८ येथील शाळा क्रमांक ४ मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
सानपाडा येथील सेक्टर 20 मध्ये असणाऱ्या झोपडपट्टीच्या नागरिकांच्या दृष्टीने 100 नागरिकांना जयपुरियार येथील शाळेत स्थलांतरित केले आहे. तसेच ऐरोली येथील रेम्बो सर्कस तंबूतील २५ महिला कलाकार, दोन लहान मुले, पाच पुरुष कलाकार यांनाही स्थलांतरित करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जोरदार वाऱ्यामुळे नवी मुंबई परिसरात ३३ झाडे व झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. ते उचलण्याचे काम अग्निशमन विभागामार्फत तातडीने सुरू आहे. तसेच पालिकेच्या माध्यमातून नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात येत आहे.