महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईतील 'त्या' मर्सिडीज चालकाला अटक

मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी येत असतानाच दोन सख्खे भाऊ बसलेल्या मोटार सायकलला पाम बीच रोडवर मर्सडीज कारने धडक दिली. या अपघातात मोटार सायकलवर बसलेल्या दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

ACCIDENT VEHICLES
अपघातग्रस्त वाहन

By

Published : Feb 8, 2021, 5:12 PM IST

नवी मुंबई - येथील पाम बीच रोडवर शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडीज कारने धडक दिल्याने बाईकवर बसलेल्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. ते
मित्रांच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून घरी येत होते. बाईकला धडक देऊन मर्सडीज कारने प्रवास करणारी व्यक्ती कार घटनास्थळी तशीच टाकून पळाला होता. अखेर संबधित आरोपीला गजाआड करण्यास एपीएमसी पोलिसांना यश आले आहे. रोहन ॲबोट असे या तरुणाचे नाव असून तो प्रसिद्ध ॲबोट हाॅटेलचे मालकाचा मुलगा आहे.

दोन सख्ख्या भावांचा मृत्यू -

मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी येत असतानाच दोन सख्खे भाऊ बसलेल्या मोटार सायकलला पाम बीच रोडवर मर्सडीज कारने धडक दिली. या अपघातात मोटार सायकलवर बसलेल्या दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अक्षय अनिल गमरे (27), संकेत अनिल गमरे (29) अशी मृत तरुणांची नावे आहेत. ते नवी मुंबईतील वाशी येथे राहत होते.

हेही वाचा -गुटखा विक्री प्रकरणी राज्य सरकार व पोलिसांना उच्च न्यायालयाची नोटीस

अपघातानंतर पलायन -

अपघात झाल्यानंतर मर्सडीज कार चालक कार सोडून पळून गेला होता. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात चालकाच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी पलायन केलेल्या मर्सडीज चालकास अटक केले आहे. रोहन ॲबोट असे या तरुणाचे नाव असून तो प्रसिद्ध ॲबोट हाॅटेलचे मालकाचा मुलगा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details