महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा - सच्चिदानंद शेवडे - राष्ट्रपुरुषाची किंवा क्रांतीकारकाची कोणत्याही स्वरूपात कोणत्याही माध्यमातून केली जाणारी बदनामी बंद व्हावी

३१ व्या अखिल भारतीय एकदिवसीय स्वा. सावरकर संमेलनात सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव अन्य ५ ठरावाबरोबर संमेलनाध्यक्ष सच्चिदानंद शेवडे यांनी मांडला तर उपस्थितांनी हात उंचावून याला अनुमोदन दिले.

उपस्थितांना संबोधित करतांना सच्चिदानंद शेवडे

By

Published : Jun 16, 2019, 10:25 PM IST

ठाणे - राष्ट्राच्या अपमानाने आपल्या भावना पेटून उठल्या असत्या तर फाळणीनंतर जगाच्या नकाशात पाकिस्तान दिसला नसता. पाकिस्तानचे ६ तुकडे होऊन लवकरच हा देश नष्ट होणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सावरकर अभ्यासक, साहित्यिक, प्रवचनकार व प्रसिद्ध व्याख्याते सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

संमेलनात उपस्थित श्रोते


कल्याण येथे आयोजित ३१ व्या अखिल भारतीय स्वातत्र्यवीर सावरकर एकदिवसीय संमेलनातील अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या संमेलनात सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठरावसह अन्य ५ ठराव संमेलनाध्यक्ष सच्चिदानंद शेवडेंनी मांडले तर उपस्थितांनी हात उंचावून याला अनुमोदनही दिले.


शेवडे यांनी सावकरांचे महान कार्यही उपस्थितांसमोर मांडले. सावरकरांपेक्षा आपला मोठेपणा दाखविण्याची विरोधकांची केविलवाणी धडपड सुरु आहे. या टीकाकारांमुळेच अनेकजण सावरकर वाचायला लागले असून यामुळे टीकाकारांचा खोटेपणा उघड होऊ लागला आहे. सावरकरांवर टीका करणाऱयांचे थोबाड बंद करण्यासाठी सावरकरांना भारतरत्नाने सन्मानित करण्यात यावे. कोणत्याही पुरस्काराने सावरकर मोठे होणार नाहीत, तर तो पुरस्कारच मोठा होईल असे ते म्हणाले.


श्रद्धा ही माणसाची गरज असून हिंदूंची धर्मियांची श्रद्धा नष्ट केल्यास इतर धर्मियांच्या श्रद्धा हिंदुत्वावर आरूढ होतील. विकृत श्रद्धेच्या विरुद्ध समाजाची लढाई असली पाहिजे. देशाला घरात घुसून मारण्याची भाषा करणारा पंतप्रधान प्रथमच मिळाल्याचे ते म्हणाले.


या संमेलनात सावरकरांना भारतरत्न पुरस्कार विना विलंब देण्यात यावा, पोर्ट ब्लेअर नगरीला वीर सावरकरनगर असे नाव द्या, लंडन मधील निवासस्थान केंद्र किंवा राज्य सरकारने ताब्यात घ्यावे आणि त्याठिकाणी एखाद स्मारक तयार करावे, जयोस्तुते हे मंगलगीत शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, शालेय शिक्षणात किमान १ वर्ष तरी सैनिकी शिक्षणाचा अंतर्भाव करावा, राष्ट्रपुरुषाची किंवा क्रांतीकारकाची कोणत्याही स्वरूपात कोणत्याही माध्यमातून केली जाणारी बदनामी बंद व्हावी असे सहा ठराव मांडण्यात आले.


या संमेलनात ज्येष्ठ पत्रकार विनायक परब यांनी 'काश्मीर वर्तमान आणि भविष्य' या विषयावर भाष्य केले. सावरकराच्या सुनबाई सुंदरा सावरकर यांची 'सावरकर घराण्यातील स्त्रियाचे योगदान' या विषयावर मुलाखत घेण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, डॉ उल्हास कोल्ह्टकर, डॉ. रत्नाकर फाटक यांचे 'भारत महासत्तेच्या दिशेने' या विषयावर व्याख्यान झाले.
या एकदिवसीय संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्य्क्ष तथा जेष्ठ साहित्यिक, प्रवचनकार, सावरकर अभ्यासक व प्रसिद्ध व्याख्याते सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कल्याण पश्चिमचे आमदार नरेद्र पवार हे स्वागताध्यक्ष होते. व्यासपीठावर महापौर विनिता राणे, केजीएसबी बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन प्रभाकर संत, आदि उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details