महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात ३० वर्षीय युवकाची हत्या; 6 आरोपींना अटक - ३० वर्षीय युवकाची हत्या

वागळे इस्टेटमधील हाजुरी परिसरात मृत रामावतार धोबी आणि या घटनेतील आरोपी हे एकाच भागात राहतात. रामावतार यांनी एका मुलीची छेड काढल्याच्या रागातून दहा जणांनी मिळून त्याला लाथाबुक्क्याने जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तत्काळ वागळे इस्टेट पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाकडून नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठाण्यात ३० वर्षीय युवकाची हत्या
ठाण्यात ३० वर्षीय युवकाची हत्या

By

Published : May 31, 2021, 10:04 PM IST

ठाणे -ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात रविवारी संध्याकाळी साडे दहाच्या सुमारास, मुलीची छेड काढल्याप्रकरणी, दहा व्यक्तींनी मिळून एका तीस वर्षीय युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाकडून त्यांना नऊ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वागळे इस्टेटमधील हाजुरी परिसरात मृत रामावतार धोबी आणि या घटनेतील आरोपी हे एकाच भागात राहतात. रामावतार यांनी एका मुलीची छेड काढल्याच्या रागातून दहा जणांनी मिळून त्याला लाथाबुक्क्याने जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तत्काळ वागळे इस्टेट पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाकडून नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वागळे पोलीस इतर चार आरोपींचा शोध घेत आहेत.

मृतकावरही गुन्हा दाखल

या प्रकरणात वागले इस्टेट पोलिसांनी मृतकावर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याबाबतही पोलीस अधिक तपास करत आहेत. या गुन्ह्यात आधी छेडछाड करण्यात आल्याने त्यानंतर त्याला मारहाण केली आहे. म्हणून पोलीस परस्पर विरोधात गुन्हे दाखल करून तपास करत आहेत.

हेही वाचा-बारामतीतील माळेगावात जिल्हा परिषद सदस्याच्या पतीवर गोळीबार

ABOUT THE AUTHOR

...view details